स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना पुणे सत्र न्यायालयात राहण्याचे आदेश

शुक्रवार, 31 मे 2024 (16:38 IST)
राहुल गांधी यांनी भारताचे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, साहित्यिक आणि क्रांतिकारी चळवळीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत लंडन मध्ये केलेल्या वक्तव्याचा राहुल गांधी यांना पुणे सत्र न्यायालयाने 19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात राहण्याचे आदेश दिले आहे. 

राहुल गांधींनी लंडन येथे भारतीय समुदायांच्या लोकांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा आरोप असून पुणे पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट पुणे येथील सत्र न्यायालयात दाखल केला आहे या बाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात राहुल गांधींवर मानहानीचे याचिका दाखल केली होती. या वर न्यायालयाने विश्रामबाग पोलिसांना प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले होते. 
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी भाषणात सावरकरांबद्दल म्हटले होते की सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले आहे की, मी माझ्या 5-6 मित्रांसह एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली आणि असं करून मला आनंद मिळाला. 
या वक्तव्याचे खंडन करत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकरांनी आक्षेप घेत  भा.दं.संहिता कलम  500 ​​आणि 499 अंतर्गत राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार एप्रिल मध्ये दाखल केली. 
 
विश्राम बाग पोलिसांनी या तक्रारी बाबत तपास केल्यावर ते प्रथमदर्शनी सत्य असल्याचे समोर आले असून या वक्तव्यावर राहुल गांधी यांना पुणे सत्र न्यायालयाने 19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहे. यावर आता राहुल गांधी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती