राहुल गांधी विरोधात सावरकर यांच्या नातूने केलेल्या तक्रारीमध्ये सत्यता, पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये दिला रिपोर्ट
मंगळवार, 28 मे 2024 (10:47 IST)
सत्यकी अशोक सावरकर आणि आणि व्यवसायाने वकील असलेले संग्राम कोल्हटकर हे म्हणाले की, रिपोर्ट न्यायिक मॅजिस्ट्रेट अक्षी जैन च्या नायालयात सादर करण्यात येईल. कोल्हटकर म्हणाले की, न्यायालय राहुल गांधी यांना नोटीस पाठवून हजार राहण्यास सांगू शकते.
विडी सावरकर यांचे नातू व्दारा राहुल गांधी विरोधात दाखर तक्रार मध्ये पुणे पोलिसांनी सोमवारी एक न्यायालयामध्ये आपली चौकशी रिपोर्ट दाखल केली. सावरकरांच्या नातूने काँग्रेस नेता वर 2023 मध्ये लंडनमध्ये दिल्या गेलेल्या एका भाषणात हिदुत्व विचारक यांना बदनाम करण्याचा आरोप लावला होता. रिपोर्ट मध्ये पोलिसांनी सांगितले की, तक्रारीमध्ये प्राथमिक दृष्ट्या सत्यता आहे.
तक्रारकर्ता सत्यकी अशोक सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर हे म्हणाले की, रिपोर्ट न्यायिक मॅजिस्ट्रेट अक्षी जैन च्या न्यायालयात सादर करण्यात येईल. कोल्हटकर म्हणाले की, न्यायालय राहुल गांधी यांना नोटीस पाठवून हजर राहण्यासाठी सांगू शकते. सात्यकी सावरकर म्हणाले होते की, त्यांचे वकील एप्रिलमध्ये आईपीसी कलाम 499 आणि 500 नुसार तक्रार घेऊन कोर्टात गेले होते.
न्यायालयाने विश्रामबाग पोलिसांना सात्यकी यांच्या वतीने मिळालेल्या पुराव्यांची चौकशी करून आणि 27 मे पर्यंत एक रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले होते. कोल्हटकर म्हणाले की, 'विश्रमबाग पोलिसांनी सांगितले आहे की, सात्यकी सावरकर यांनी एप्रिल मध्ये न्यायालयात तक्रार दाखल केली होती ज्यामध्ये काँग्रेस नेता राहुल गांधी वर मार्च 2023 मध्ये लंडन मध्ये दिल्या गेलेल्या भाषणात प्रसिद्ध क्रांतिकारी विडी सावरकर यांना घेऊन खोटे दवे केल्याचा आरोप लावण्यात आला होता.'
तक्रारी अनुसार, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात दावा केला होता की, विडी सावरकर यांनी एका पुस्तकात लिहले होते की, त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती. ज्यामुळे सावरकरांना आनंद झाला होता. तक्रारीत सांगितले आहे सात्यकी सावरकर म्हणाले की, अशी कोणतीच घटना कधीच झाली नाही. तसेच सावरकरांनी अशी कोणतीच बाब लिहलेली नाही. त्यांनी राहुल गांधींच्या आरोपांना काल्पनिक, खोटे आणि दुर्भावनापूर्ण सांगितले.
कोल्हटकरांनी सांगितले की, 'विश्रामबाग पोलिसांनी आज न्यायालयात एक रिपोर्ट सादर केली आनि कोर्टाला सांगितले की, त्यांच्या चौकशीदरम्यान हे समोर आले की, विडी सावरकरांनी आपल्या पुस्तकात अशी कोणतीही घटना लिहलेली नाही. तरी देखील राहुल गांधींनी आपल्या भाषणात या प्रकारची टिप्पणी केलेली पोलिसांनी सांगितले की प्राथमिक दृष्ट्या सत्यकी सावरकर यांच्या तक्रारीमध्ये सत्यता आहे की राहुल गांधींनी आपल्या भाषणात विडी सावरकर यांना बदनाम केले होते.