सिंधुदुर्गच्या तारकर्ली येथील नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नौदलाच्या पदांची नावे बदलणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावेळी 'समु्द्रावर वर्चस्व तो सर्वशक्तीमान हे सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला, असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
दरम्यान नौदल दिनानिमित्त कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण राजकोट किल्ल्यात पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. या अनावरण कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोणत्याही देशात समुद्राचं सामर्थ्य महत्वाचं असतं. याचं महत्व छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळं त्यांनी शक्तीशाली नौदल तयार केलं. त्यांचं मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत'.
'भारताने गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे. आता आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी आहेत. गेल्यावर्षी नौदलाचा ध्वजाचा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं. हे माझं भाग्य समजतो. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची मुद्रा असेल. तसेच नौदलाच्या पदाला भारतीय परंपरेची नावे देणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.