नाणी गोळा करणारे आणि अभ्यास करणारे नाणेशास्त्रज्ञ सुधीर लुणावत यांनी सांगितले की, 525 रुपयांचे हे पहिले नाणे असेल. या विशेष नाण्याचे वजन 35 ग्रॅम असेल, जे 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, पाच टक्के निकेल आणि पाच टक्के जस्त यांच्या मिश्रणाने बनवले जाईल.
सुधीर यांनी सांगितले की, हे नाणे भारत सरकारच्या कोलकाता टकसाल ने बनवले आहे. हे नाणे सामान्य चलनात राहणार नाही. मात्र काही दिवसांनी सरकार प्रिमियम दराने लोकांना विकणार आहे. ज्याला हेरिटेज म्हणून ठेवता येईल.