कोरोना: एप्रिल फूल केल्यास जेलची हवा

मंगळवार, 31 मार्च 2020 (13:21 IST)
बारामती- दरवर्षीप्रमाणे जर यंदाही तुम्ही इतरांना एप्रिल फूल करण्याची स्वप्न रंगवत असाल तर जरा सांभाळून. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही अफवा पसरवू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाची सध्या समाज माध्यमांवर करडी नजर आहे.
 
1 एप्रिल 2020 रोजी एप्रिल फुल म्हणून वेगवेगळ्या प्रकाराचे मेसेज पाठवले जाऊ शकतात. अशात उत्साहात घराबाहेर पडू नये असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी नागरिकांना केले आहे. कोरोना बाबत संभ्रमीत करणारे संदेश सोशल मीडियाद्वारे पसरवणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
एप्रिल फूल करण्याच्या नादात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जमाबंदी उठले आहे किंवा सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. अशा मेसेजला बळी न पडता अडचणी वाढवू नये तसेच अशा स्वरूपाचे मेसेज लोकाकडून सोशल मीडियावर व्हारल झाल्यास व्हायरल करणाऱ्यावर त्याचबरोबर ग्रुप ॲडमिनवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 
 
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप ॲडमिन ने आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात. तसेच सेटिंग मध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज पाठवू शकेल असे सेटिंग करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती