भारतात अजून करोना व्हायरसच्या समूह संसर्गाला सुरुवात झालेली नाही. देश अजून करोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलंय. देशात करोना व्हायरसा प्रादुर्भाव समूहांमध्ये अतिशय मर्यादित प्रमाणात सुरू झाल्याचं सांगण्यात येत होतं.
भारतात करोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारताने प्रभावी आणि वेळेवर उपाययोजना राबवल्याने करोनाचा संसर्ग हा समूहांमध्ये फैलावलेला नाही. पण तरीही सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि काळजी घेण्याची गरज आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना नव्याने काही निर्देशही जारी केले आहेत.