इतर देशात दुष्कर्मासाठी शिक्षा

शनिवार, 21 मार्च 2020 (13:43 IST)
जगभरात देखील दुष्कर्म आणि त्यासंदर्भातील गुन्ह्यामध्ये आरोपींना कठोर शिक्षा दिली जाते. इतर काही देशांमध्ये दुष्कर्म करणार्याआला   कशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात यावर टाकलेली नजर...
 
नॉर्वे : समोरच्या व्यक्तीच्या मर्जीविरुद्ध कोणतेही लैंगिक कृत्य केले तर ते दुष्कर्म मानले जाते. तसाठी 4 ते 15 वर्षांपर्यंत तुरूंगवास होऊ शकते.
 
अमेरिका : अमेरिकेत दुष्कर्माच्या गुन्ह्यासाठी दोन प्रकारचे कायदे आहेत. एक फेडरल आणि एक स्टेट. येथे राज्याचे वेगवेगळे नियम आहेत.
 
फ्रान्स : येथे दुष्कर्माचे कायदे कठोर आहेत. 15 वर्षांच्या तुरूंगवासापासून 30 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
 
बांगलादेश : या देशात आरोपीला घडलेल्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन शिक्षा दिली जाते.
 
पाकिस्तान : येथे लहान मुलांवर दुष्कर्म करणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे यासाठी मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. परंतु दुष्कर्माच्या बर्यासच घटनांमध्ये आरोपी निर्दोष सुटतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती