करोनाग्रस्तांची नावं उघड करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आदेश विभागीय उपायुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिले आहेत. ज्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय आहे त्यांनी शक्यतो घरातच थांबावं असंही म्हैसकर यांनी म्हटलं आहे. पुणेकरांनी खबरदारी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
गर्दीची ठिकाणं टाळा, वेळोवेळी हात धुवा. घरात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या. जिथे अनोळखी लोकांचा संपर्क होईल त्या ठिकाणी उदाहरणार्थ मॉल, बाजारपेठा या ठिकाणी जाणं टाळा. हा नियम माझ्यासकट सगळ्यांना लागू आहे असंही म्हैसकर यांनी म्हटलं आहे.