दरवर्षी फेम इंडिया मासिक आणि आशिया पोस्ट सर्व्हे देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर करते. समाजातील स्थान, व्यक्तीचा प्रभाव, त्यांची प्रतिमा, त्यांचं उद्दिष्ट या सर्व बाबींचा विचार ही यादी जाहीर करताना केला जातो. यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील लोकांची मतं विचारात घेतली जातात. समाजसेवा, खेळ, पत्रकार, राजकारण, कला यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना या यादीद्वारे गौरवण्यात येते. ज्या व्यक्तींनी गेल्या वर्षभरात महिला सबलीकरण आणि देशसेवेसाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा व्यक्तींचा या यादीत समावेश असतो.