ज्या काळात महिलांवर अनेक बंदी घातली जात होती, साधारण घरातून बाहेर पडण्यासाठी देखील पुरुषांची परवानगी घ्यावी लागायची त्या काळात त्या भारताच्या पहिल्या महिला पायलट झाल्या. जगातील सर्व विरोधांना तोंड देत त्यांनी स्वत:चं आणि कुटुंबाचं स्वप्न पूर्ण केलं.
पतीच्या निधनानंतर त्या लाहोराहून पुन्हा भारतात आल्या आणि मेयो स्कूल ऑफ आर्टमध्ये भरती झाल्या. येथे त्यांनी पेंटिंगचे शिक्षण घेतले आणि फाइन आर्टमध्ये डिप्लोमादेखील केला. भारताचे विभाजन झाल्यावर सरला आपल्या दोन्ही मुलींसोबत दिल्लीला परत आल्या आणि येथे त्यांना पीपी ठकराल भेटले. दोघांनी 1948 मध्ये विवाह केले. नंतर त्या यशस्वी आणि उद्योजक पेंटर झाल्या.