मन मारून जगू नका, कामात स्वत:ला व्यस्त ठेवा पण लक्षात ठेवा की टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊन अडचणी कमी होत नाही तर त्या वाढतातच. मन शांत ठेवा आणि अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. समवयस्क, जुन्या बाल मित्रांशी संपर्क साधा. आयुष्य फक्त काम करण्यासाठी आणि टॅक्स भरण्यासाठी नाही, त्याचा उपभोग घ्या. वर्षातून एकदा तरी नवीन जागी फिरायला जा, आवडेल ते खा, पण प्रमाणात. साहित्य वाचा, गाणी एका, थोडा का होईना पण रोज व्यायाम देखील करा. आनंदात राहा आणि स्वत:वर प्रेम करा. शरीराला त्याच कार्य करू द्या. मृत्यू कधी आणि केव्हा येईल हे कोणालाच माहीत नसतं. वेळ हातून वाळूसारखा निसटून चाललाय. जो वेळ तुमच्याजवळ शिल्लक आहे आयुष्य भरभरून जगा. भूतकाळावर पश्चात्ताप आणि भविष्याची काळजी करण्यापेक्षा वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा.