Pankja Munde: राजकीय ब्रेक नंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय,काढणार शिवशक्ती यात्रा

मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (15:22 IST)
पंकजा मुंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर त्या अचानक गायब झाल्याची चर्चा सुरु होती. मधूनच पंकजा मुंडे यांनी भाजपला रामराम केल्याची चर्चा सुरु झाली. गेल्या काही वर्षापासून त्यांना पक्षाकडून डावलण्यात येत असल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे पंकजा मुंडे या लवकरच भाजपला रामराम करणार असून त्या दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश करण्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
 
तर पंकजा मुंडे यांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची चर्चा देखील रंगली होती. परंतु आपण दिल्लीत कोणाचीही भेट घेतली नसल्याचे सांगत पंकजा मुंडे यांच्याकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या चर्चांना पूर्णविराम दिला. 
 
मागील दोन महिन्यांपासून राजकीय ब्रेक घेत पंकजा मुंडे या राजकारणापासून पूर्णतः दूर गेलेल्या होत्या. या कालावधीत त्या कुठेही दिसून आल्या नाही. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाल्यानंतर देखील  पंकजा मुंडे यांनीकोणतेही वक्तव्य किंवा मत दिले नाही.  गेल्या 2 महिन्यांपासून त्यांनी स्वतःला राजकारणातून लांब ठेवले होते. गेल्या 2 महिने त्यांनी राजकारणातून ब्रेक घेत असल्याची माहिती दिली होती. आता दोन महिन्यांनंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्यापासून येत्या सप्टेंबर मध्ये त्या शिवशक्ती यात्रा काढणार आहे. हा त्यांचा 11 दिवसीय दौरा असणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने त्या वेगळ्यावेगळ्या जिल्ह्यात जाऊन देवदर्शन करणार आहे. 
 
या यंत्रातून त्या 10 हुन अधिक जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. हा दौरा राजकीय नसून देवदर्शनासाठीचा दौरा असल्याची माहिती स्वतः पंकजा मुंडे यांनी दिली. 
या यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी नगर मधील घृष्णेश्वर मंदिरापासून सुरु होणार नंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, आणि कोल्हापूर या ठिकाणी देवदर्शन करणार आहे.   
 
 दोन महिन्यानंतर राजकारणात सक्रिय होत असलेल्या पंकजा मुंडे आता पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती