सध्या पावसाने राज्यात पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर केल्याची मागणी केली. या वर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुष्काळावर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाच्या वॉर रूम ला दुष्काळ नियंत्रण वॉर रूम तयार केला जाणार आहे.
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सीएम वॉर रूम मधून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहे. या रूम मधून दुष्काळाच्या हद्दीतील गाव, तालुका जिल्हे, विभागावर दुष्काळाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. हे ठिकाण या वॉर रूम शी जोडले जाणार आहे.