तसेच महिला आणि बालविकास विभागाने तात्काळ कारवाई करत १४ जुलै रोजी साकोली पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे आणि तो एका आश्रयगृहात सुरक्षित आहे. चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर मुलाच्या विक्रीची तक्रार आल्याने ही घटना उघडकीस आली. या तक्रारीनंतर, चाइल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक तपास सुरू केला. तपासात हे मूल बेकायदेशीरपणे दत्तक घेतल्याचे उघड झाले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साठवणे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.