शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल हिंगोलीत सभा झाली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील कळमनुरी येथे कावड यात्रा काढली. आमदार बांगर यांनी गळ्यात फुलांचे हार, रुद्राक्षाची माळ, हातात झांज आणि भगवा कपडे परिधान केले होते.
कार्यकर्ता हार घालून त्यांचे सत्कार करत असताना मधूनच त्यांनी एका कार्यकर्त्याने दिलेल्या तलवारीला म्यानातून काढूंन फिरवून दंड थोपटून शक्ती प्रदर्शन केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या कावड यात्रेत विविध भागातून कार्यकर्त्ये आले होते.आमदारांनी कावड यात्रेत तलवार फिरवल्या प्रकरणी त्यांच्यावर कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्याचे प्रत्युत्तर देत आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती त्यात कालिचरण महाराज यांच्या सह हजारोच्या संख्येत शिवभक्त उपस्थित होते. या वेळी संतोष बांगर यांनी म्यानातून तलवार काढून फिरवली आणि ही यात्रा म्हणजे हे हिंदुत्वाचा जल्लोष आहे. हे सर्व शिवसैनिक आणि शिवभक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहे. हे काही शक्ती प्रदर्शन नाही. म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. या कावड यात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.