सत्याचा नेहमी विजय होतो. आमची 2 तृतीयांशपेक्षा बहुमत होतं ही वस्तुस्थिती आहे.आम्ही त्यांना सांगायला गेलो
आमदारांना परत बोलवा आम्ही परत येतो. मात्र तु्म्ही निघून जावा अस सांगण्यात आलं.प्रत्येक मोठ्या माणसाने आपला इगोला वेसन घातलं पाहिजे.नाहीतर परिस्थिती उभी राहते.भाजपने आम्हाला कधीही फोडलं नाही.
युती म्हणून राहूया अस आम्ही म्हटलं होतो. मात्र त्यांनी ऐकलं नाही.बाळासाहेबांच्या विचारामुळे शिवसेनेत आलो नाहीतर त्याच वेळी मी भाजपमध्ये गेलो असतो आणि केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो.कोकणची जबाबदारी माझ्यावर आली असती, असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, वापरा आणि सोडून द्या हे बाळासाहेबांनी कधी केली नाही. मोदी देशातील नेत्यांना महात्मा गांधींच्या समाधी स्थळे नेऊ शकतात. मग उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना बाळासाहेबांच्या समाधीस्थळी का नेलं नाही असा सवालही केसरकरांनी केला.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना केसरकर म्हणाले की, जरांगे-पाटील यांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असल्याने त्यांनी जालन्याला यावं अशी त्यांची इच्छा आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत.