Nashik : नाशिक जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर तासाभरानंतर रुग्णाचे पाय हलले आहे. या रुग्नांवर एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या देखरेखी काही उपचार सुरु होते. हा रुग्ण 93 टक्के भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात आणला गेला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना डॉक्टरांनी त्याला जिवंत असून इसीजी रिपोर्टच्या अनुसार मृत घोषित केले.मात्र हा रुग्ण तासाभरात जिवंत असल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारामुळे नातेवाईकांचा संताप होत आहे. त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला असून जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाला केली असून रुग्णालय प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे समजले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने सोमवारी स्वतःला पेटवले. याला रुग्णालयात 93 टक्के भाजलेल्या अवस्थतेत आणण्यात आले. ईसीजी मध्ये त्याच्या हृदयाचे ठोके बंद असल्याचे आढळले त्यामुळे प्रशिक्षित डॉक्टरांना रुग्ण मृत झाल्याचे समजले आणि त्यांनी त्याला मृत घोषित केले. मात्र तासाभराने रुग्णाचे पाय हल्ल्याने रुग्ण जिवंत असल्याचे समजले. आणि त्याच्यावर पुन्हा उपचार सुरु करण्यात आले.