भारताचा आंतरराष्ट्रीय रोइंगपटू असलेल्या दत्तू भोकनळला मुंबई हायकोर्टाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या त्याच्या पत्नीने दत्तू विरोधात तक्रार दिल्याने त्याच्याविरोधात ४९८(अ) कलमाखाली कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तक्रारदाराच्या आरोपात तथ्य दिसत नाही असे नमूद करीत हायकोर्टाने हा गुन्हा रद्द केला आहे. रोइंगपटू दत्तू भोकनळला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून यामुळे आता दत्तूला रोईंग स्पर्धेसाठी ऑस्ट्रियाला जाण्याचा मार्ग मोकळा आहे. नाशिक जिल्हा न्यायालयात दत्तूच्या पत्नीने दाखल केलेली कौटुंबिक हिंसाचाराची आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावत सदर प्रकरणी पत्नीची कोणतीही (४९८ अ अंतर्गत) फसवणूक अथवा छळ करण्यात आला नसल्याचे नमूद केले आहे तर कोणताही आरोप सिद्ध होत नाही असे सांगितले आहे. दत्तूने या महिलेसोबत लग्न केल्याचे मान्य केल्यामुळे याचिकेत कोणतेही तथ्य नसल्याचे निरीक्षण नोंदवून महीलेची मागणी फेटाळून लावत गुन्हा रद्दबाद ठरवला आहे. ऑस्ट्रेलियात येथे येत्या २ ऑगस्ट रोजी दत्तू आंतरराष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. यासाठी त्याला कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी त्याने ही याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयाने जर त्याला परवानगी दिली तर त्याला या स्पर्धेत सहभागी होता येणार होते.