मराठा क्रांती मोर्चाच्याकडून पुन्हा ठिय्या आंदोलनाचा इशारा

गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (08:53 IST)
कोपर्डीच्या आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावीत आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्या ८ ऑगस्टपर्यंत न सोडविल्यास ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने राज्यभर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचेसमन्वयक रविंद्र काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक औरंगाबादेतील यशवंत कला महाविद्यालयात दिवसभर पार पडली.बैठकीच्या सुरवातीला उपस्थित मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नावाचा गैरवापर करणार नाही, अशी सामुहिक शपथ घेतली. यानंतर दिवसभर विविध मुद्यांवर चर्चा झाली. कोपर्डीतील पीडितेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींनी फाशीच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहेत. या अपीलावर आपले म्हणणे मांडण्यासाठी शासनाने अद्यापही वकिल नेमला नाही. यामुळे आरोपींच्या या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. परिणामी आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लांबली 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती