सुरुवातीला 6 नंबरचा दरवाजा उघडला तर त्यानंतर पाठोपाठ तीन नंबरचा दरवाजा उघडला आहे. या दोन्ही दरवाजातून प्रतिसेकंद 2856 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरूझाला आहे. तर विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून एकूण प्रतिसेकंद 4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदी पत्रात सुरू आहे. दरम्यान, धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस अजूनही सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.