चमचमीत मिसळ तयार करणे इतकेही अवघड नाही

साहित्य : 500 ग्रॅम मोड आलेली मटकी
2 कांदे
2 टोमॅटो
10-12 लसूण पाकळ्या
4-5 हिरव्या मिरच्या
1 इंच आल्याचा तुकडा
1 लहान काडी दालचिनी
2 लवंगा
1 तमालपत्र
1 चमचा धनेपूड
2 चमचा गोडा मसाला
2 चमचे किसलेलं सुकं खोबरं
1 चमचा खसखस
चिंच
चवीनुसार तिखट (कश्मीरी लाल मिर्च)
चवीनुसार मीठ 
कोथिंबीर
तेल
मोहरी
हिंग
फरसाण
लिंबू
पाव किंवा ब्रेड
 
कृती:
मोड आलेली मटकी कुकरमध्ये शिजवून घ्या.
कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिरच्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, धनेपूड बारीक वाटून घ्या.
कढईत जरा तेल गरम करुन त्यात मसाला खमंग परतून घ्या. सुवास आल्यास चिरलेला कांदा आणि टॉमेटो घालून परता. 
नारळ घालून परतावा. 
मिश्रणाला तेल सुटले की गॅस बंद करून बाजूला काढून थंड करा. 
मिश्रण थंड झाल्यावर त्यात 1 ग्लास पाणी मिसळून पातळ पेस्ट तयार करा.
पुन्हा कढई गरम करुन हिंग, हळदाची फोडणी तयार करुन त्यात मसाला आणि लाल खिट घाला. मीठ घाला.
चिंचेचा कोळ घाला.
आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी घ्या.
दुसर्‍या बाजूला 2 चमचे तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग, हळदाची फोडणी देऊन मटकी घाला.
जरा पाणी घालून त्यात गोडा मसाला घालून उकळून घ्या.
आता उसळ आणि कट तयार आहे.
सर्व्ह करताना उसळ त्यावर कट आणि त्वावर फरसाण, बारीक चिरलेला कांदा, लिंबू पिळून पाव किंवा ब्रेडसोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती