मिळालेल्या माहितीनुसार बसेसच्या कमतरतेचा सामना करत असलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) त्यांच्या ताफ्यात ३,००० नवीन बसेस जोडणार आहे. यासाठी ई-निविदाही जारी करण्यात आली असून या बसेस ११ मीटर लांबीच्या असतील. या खरेदीसाठी परिवहन महामंडळाने नुकत्याच जारी केलेल्या ई-निविदेत बोली लावण्याची शेवटची तारीख १४ मे आहे आणि ती दुसऱ्या दिवशी उघडली जाईल. तसेच एमएसआरटीसी डिझेल इंजिन बसेस खरेदी करत आहे कारण या बसेस लांब पल्ल्याचे प्रवास करतात आणि ग्रामीण भागात प्रवास करतात. यासोबतच, इंजिन आणि वाहनाच्या देखभालीसाठी ७ वर्षांचा करार असेल. या कराराअंतर्गत, ज्याला हे कंत्राट मिळेल त्याला ७ वर्षांचा वार्षिक देखभाल करार देखील करावा लागेल, ज्यामध्ये कंत्राटदारांना इंजिन आणि संबंधित यंत्रणेची देखभाल करावी लागेल तर इतर भागांची देखभाल एमएसआरटीसी मेकॅनिक करतील. १४,५०० बसेस कार्यरत आहे.
सध्या, एमएसआरटीसीकडे २५१ डेपो आणि ३१ विभागांचे विशाल नेटवर्क असून १४,५०० हून अधिक बसेस चालवल्या जातात. पण, त्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहे. सणासुदीच्या काळात लोकांना बसेसच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आणि महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर बसेस तुडुंब भरलेल्या असतात.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटावर घेतलेल्या १,३१० बसेसच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेस भाड्याने देण्याच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततांची एका महिन्याच्या आत चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या प्रक्रियेमुळे परिवहन विभागाला १,७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, विभागवार बसेस घेण्याची सध्याची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सर्व विभाग तीन गटांमध्ये विभागले आहे.