मिळालेल्या माहितीनुसार देहू रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणाले की, आम्हाला माहिती मिळाली की ४-५ मुले इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी आली होती आणि त्यापैकी तिघे बुडाले आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिस डीसीपी म्हणाले की, पुढील तपास सुरू आहे.