मिळालेल्या माहितीनुसार गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने वीजदर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वीज दर कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील जनतेला त्यांच्या वीज बिलांमध्ये मोठा दिलासा मिळेल. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शनिवारी रात्री उशिरापासून नवीन दर जाहीर केले आहे. सरकारच्या नवीन निर्णयानुसार, राज्यातील दीड कोटींहून अधिक ग्राहकांना पुढील पाच वर्षांसाठी स्वस्त दरात वीज मिळेल.