मिळालेल्या माहितीनुसार ही घटना अजनी पोलीस स्टेशन परिसरातील गुलमोहर कॉलनी येथील आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेने नागपूर शहर हादरले आहे आणि शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मृत विद्यार्थिनी अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेत शिकत होती. ती शाळेतून घरी परतत असताना एका अल्पवयीन आरोपीने तिचा रस्ता अडवला. यानंतर, कोणालाही काही समजण्यापूर्वीच, आरोपीने मुलीवर चाकूने अनेक वार केले, ज्यामुळे ती रक्ताळलेल्या अवस्थेत पडली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिस ठाण्याचे पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तर आरोपीने मुलीवर चाकूने वार केल्यानंतर लगेचच घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जाते. आरोपीला अटक करण्यासाठी अनेक पोलिस पथके पाठवण्यात आली आहे. मात्र, या हत्येने नागपूर शहर हादरले आहे. हत्येपूर्वी आरोपीने संबंधित विद्यार्थिनीला फोन केल्याचे सांगितले जाते. मुलगी शाळेतून घरी जात असताना आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले. तसेच पोलिस अधिक तपास करत आहे आणि आरोपीचा सखोल शोध सुरू आहे.