मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत डिजिटल अटकेचे आणखी एक मोठे प्रकरण समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्यांनी ७० वर्षीय शास्त्रीय गायकाला १८ दिवस 'डिजिटल अटक'मध्ये ठेवले. या काळात त्यांच्याकडून १.२ कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप केला आणि १८ दिवस त्याच्यावर पाळत ठेवली. या काळात, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना कायदेशीर कारवाईची धमकी देऊन पैसे हस्तांतरित करण्यास धमकावले. या काळात त्यांनी कोणाशीही बोलू नये असे ही सांगितले.