11,000 कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश

Webdunia
गुरूवार, 26 मार्च 2020 (22:03 IST)
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलत आहे. लॉकडाउननंतर सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव पर्याय असल्याने महत्तवाचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
राज्यातील अकार हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
 
अनिल देशमुख यांनी म्हटले की सात वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील 60 तुरूंगांतील जवळपास अकरा हजार कैद्यांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख