ठाण्यात पैशांच्या वादातून मित्रांनीच केली तरुणाची हत्या

रविवार, 25 मे 2025 (16:21 IST)
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे पैशाच्या वादातून एका तरुणाची हत्या  ही संपूर्ण घटना तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 
ALSO READ: मुंबईत तरुणाला चष्मा न लावणे महागात पडले, ५०० रुपयांऐवजी ९०,००० रुपये गेले
सदर घटना 20 मे रोजी रात्री घडली. भाजी विक्रेता त्याच्या चार मित्रांसह परत येताना तरुणाच्या मित्रांनी त्याच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. या वरून पीडितने विरोध केला त्याचा  मित्रांशी वाद झाला.

वादाचे हाणामारीत परिवर्तन झाले. नंतर मित्रानेच त्याच्यावर 10 ते 15 वेळा चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. या वेळी तिथे काही लोक उपस्थित असून देखील त्याला कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. 
ALSO READ: बीएमसी निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत १०० जागा लढवणार
पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठून पीडितला रुग्णालयात दाखल केले. उपचाराधीन असता त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.  
ALSO READ: बाबा, माझ्या बायकोला आणि तिच्या प्रियकराला सोडू नका...निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाची मुंबईत आत्महत्या
  पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून दोघे फरार आहे. अटक झालेल्या आरोपीपैकी एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. फरार आरोपींना पोलीस शोधत आहे. 
 
Edited By - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती