कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांच्या बंगल्यावर नोटीस चिकटवली

बुधवार, 29 डिसेंबर 2021 (21:50 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून  चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याने पोलिसांनी आता नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली. नोटीसनुसार राणे यांना पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. सीआरपीसी कलम 160 (1) अन्वये नोटीस पाठवण्यात आली. पण तीन वाजून गेल्यानंतरही नारायण राणे कणकवली पोलीस स्थानकात हजर झाले नाहीत. अर्धा तास वाट पाहिल्यानंतर कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांच्या बंगल्यावर नोटीस चिकटवली आहे. नितेश राणे यांच्याबद्दल माहिती देण्याबाबत नोटिशीत उल्लेख करण्यात आलेला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. तसेच नितेश राणे नॉटरिचेबल आहेत. त्यांची माहिती मिळवण्यासाठी नारायण राणे यांना पोलीसांची नोटीस बजावण्या आली आहे. 
 
दरम्यान, नाराणय राणे यांच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस घरातील कर्मचाऱ्याने काढून टाकली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती