“आम्हाला निमंत्रण येवो अथवा न येवो, तो आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. इव्हेंट करणारी जी लोक आहेत, त्यांनी त्या काळात पळपुटेपणा केला. ज्यांना लालकृष्ण अडवाणींची आठवण होत नाही, विश्वहिंदू परिषदेचा उल्लेख होत नाही. अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करायची? असं सचिन अहिर म्हणाले.
“राम मंदिर त्यांनी घडवलेलं नाही. राजकीय पक्ष म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी परखड भूमिका मांडली होती. या विषयाला चालना देऊन सांगितलं होतं की लोकसभेत हे बिल आणा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे. परंतु, आता इव्हेंट करत आहेत, जसं काय यांनीच तिथे जाऊन विटा लावल्या आहेत. आम्हाला अभिमान आहे की राम मंदिर उभं राहतंय. मात्र, आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर जायचो तसं भविष्यात जाणार आहोत”, असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं.