तसेच रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भाजप नेते प्रवेश वर्मा यांचे विधान समोर आले आहे. रेखा गुप्ता मुख्यमंत्री झाल्या ही आनंदाची गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत, स्वतः प्रवेश वर्मा यांनी रेखा गुप्ता यांचे नाव प्रस्तावित केले.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश वर्मा यांचे नावही होते. पण, त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. प्रवेश वर्मा हे नवी दिल्ली मतदारसंघाचे आमदार आहे. त्यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. प्रवेश वर्मा यांनी तीन हजारांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकली आहे. प्रवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहेब सिंह वर्मा यांचे पुत्र आहे आणि ते खासदारही राहिले आहे.