मनोज तिवारी म्हणाले की, माध्यमांशी बोलताना मनोज तिवारी म्हणाले की, महिलांचा आदर हा भाजपचा प्राधान्यक्रम आहे. रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. संपूर्ण देशात भाजपने दुसऱ्या राज्यात आणखी एक महिला मुख्यमंत्री दिली आहे. देशाला आणखी एक महिला मुख्यमंत्री मिळाली आहे. तसेच भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, भाजप विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.#WATCH | Delhi | BJP MP Manoj Tiwari says, "Heartiest congratulations to Rekha Gupta for being elected as the CM of Delhi..." pic.twitter.com/bG8bCMddLQ
— ANI (@ANI) February 19, 2025
रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल श्रीमती रेखा गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तसेच प्रवेश वर्मा म्हणाले की, 'रेखा गुप्ता मुख्यमंत्री झाल्या आहे ही आनंदाची गोष्ट आहे.'.@BJP4Delhi के विधायक दल का नेता चुने जाने पर श्रीमती रेखा गुप्ता जी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं!@gupta_rekha
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 19, 2025
दिल्लीच्या कार्यवाहक मुख्यमंत्री आणि आप नेत्या आतिशी म्हणाल्या, "मी रेखा गुप्ता यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करते. मला आशा आहे की भाजप दिल्लीच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल. मी आपच्या वतीने सांगू इच्छिते की आमचा पक्ष येथील विकासकामांसाठी भाजपला पाठिंबा देण्यास नेहमीच तयार आहे. त्या दिल्लीच्या चौथ्या मुख्यमंत्री असतील आणि महिला मोठ्या उत्साहाने राजकारणात पुढे येत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे."#WATCH | Delhi's caretaker CM & AAP leader Atishi says, "I congratulate Rekha Gupta for becoming the CM...I hope that the BJP will fulfil all the promises that they have made to the people of Delhi...I would like to say from the AAP front that our party is always ready to extend… pic.twitter.com/Ay7mwmuiB7
— ANI (@ANI) February 19, 2025
अरविंद केजरीवाल म्हणाले, 'रेखा गुप्ता जी दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मला आशा आहे की त्या दिल्लीच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करतील. दिल्लीतील लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आम्ही त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना पाठिंबा देऊ.दिल्ली की मुख्यमंत्री बनने पर रेखा गुप्ता जी को बहुत बहुत बधाई। मैं उम्मीद करता हूँ कि दिल्ली की जनता को किए गए सारे वादे वे पूरे करेंगी। दिल्ली की जनता के विकास और भले के हर कार्य में हम उन्हें सहयोग करेंगे।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 19, 2025