शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहा विरोधात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाला संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, खलबत्ता आणि अडकित्ताने तुमची दलाली ठेचून काढू की तुम्ही पुन्हा अदानींचं नाव घेणार नाही, असा इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, धारावी प्रश्नासाठी आपण सर्व आवाज उठवत आहोत. धारावीकरांना मी वचन दिलं आहे की, तुम्ही काळजी करू नको, मी संपूर्ण मुंबईच काय अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेल. त्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले मोजके कार्यकर्ते रस्त्यावर आलो आहोत. याच वर्णन करण्याची गरज नाही आहे. मी माध्यमांना विनंती करेल की, ही दृश्य अदानी आणि त्यांच्या बापजाद्यांना दाखवा आणि ज्यांनी अदानींची सुपारी घेतली आहे, त्या सुपारीवाजांना आणि दलालांना एवढंच सांगेल की, हा अडकित्ता लक्षात घ्या. खलबत्ता आणि अडकित्ताने तुमची दलाली ठेचून काढू की तुम्ही पुन्हा अदानींचं नाव घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.