कोल्हापुरात भरधाव चारचाकीने व्यक्तीला धडक देत हवेत उडवले, गुन्हा दाखल

Webdunia
शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (18:31 IST)
कोल्हापुरात उचगाव रोडवरील घाडगे पाटील इंड्रस्टीज कंपनीच्या बाहेर रात्रीपाळीसाठी जात असताना एका व्यक्तीला वेगवान कारने धडक देऊन हवेत उडवले.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  
व्हायरल व्हिडीओ मध्ये रात्रीच्या वेळी पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या.

हाप्पे कंपनीत रात्रीपाळीसाठी कामाला जाताना रोहित सखाराम नावाच्या 24 वर्षीय तरुणाला पायी जात असताना कंपनीच्या काही अंतरावर भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की रोहित सखाराम हवेत उडाला अपघातात तरुणाच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्याचे निवेदन आले आहे.पोलिसांनी अज्ञात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

पुढील लेख