बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवा

गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (08:12 IST)
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नितीश कुमारांना बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवावा आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला घ्यावा असं उदय सामंत म्हणाले आहेत.
 
बिहारच्या जनतेने एनडीएला कौल देत त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली आहे. यावर उदय सामंत रत्नागिरीत म्हणाले, 'राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी दिलेली टक्कर ही नक्कीच कौतुकास्पद आहे. बिहारमध्ये सरकार स्थापन करताना नितीश कुमार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सल्ला घ्यायला हवा.' असं सामंत म्हणाले.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व केलं तर राज्यातील महाविकास आघाडीसारखा पॅटर्न बिहारमध्येही निर्माण होऊ शकतो असं देखील सामंत म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती