दुसर्‍याचे मन जाणून घेण्यासाठी ही युक्ती ठरेल प्रभावी

मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (14:46 IST)
काही लोक चेहऱ्याचे हावभाव वाचून दुसऱ्याचे मन जाणून घेतात, म्हणजे ते दुसऱ्यांचा मनाचे विचार जाणून घेण्यास पारंगत असतात, परंतु आपल्या मनात काय चालले आहेत हे सांगणे त्यांचा साठी शक्य नसत. म्हणून आज आम्ही आपल्याला अशी युक्ती सांगत आहोत जेणे करून आपण दुसऱ्याचा मनातले ऐकू शकाल.
 
* योगाच्या विभूतीपादामध्ये मन शक्ती योगाच्या विषयी सांगितले आहेत. याचा सरावामुळे हे शक्य आहे. या योगाची साधना केल्याने एखादा माणूस दुसऱ्याच्या मनातली गोष्ट जाणून घेऊ शकतो.
 
* योगानुसार ज्ञानाच्या स्थितीत संयम असल्यावरच दुसऱ्याच्या मनाचा ज्ञान होतो. आपण नेहमी आपल्यातच राहतो म्हणून दुसऱ्यांच्या मनातले ऐकण्यास सक्षम नसतो. आपण आपल्या मनाला शांत केल्यास दुसऱ्यांचा मनातले ऐकू शकतो.
 
* सोपे आहे की जेव्हा आपण बोलता, समोरचा ऐकत असतो. आपण बोलणं बंद करता तेव्हा समोरचा व्यक्ती काय बोलतो ते आपण ऐकता आणि समजता. त्याच प्रकारे आपले मन शांत असल्यास आपल्याला दुसऱ्याच्या मनातले ऐकू येणार.
 
* आता आपण विचारात पडत असाल की आपले मन शांत कसे राहील? तर हे ध्यान आणि सरावानेच शक्य आहे. दोन विचारांमध्ये जो अंतर आहे त्याकडे लक्ष दिल्यास आपले मन शांत होईल. 
 
असे म्हणतात की या मनःशक्ती योगाचा बळावर मुंग्यांच्या पायातल्या घुंगरूंचा आवाज देखील ऐकू शकतो. इथे तर आपल्या मनात विचारांचा गोंधळ चालला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती