* हॉट योगा करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या -
हॉट योगा करण्याच्या दरम्यान खोलीचे तापमान 40 ते 45 डिग्री असते. अश्या परिस्थितीत अति उष्णतेमुळे आपण आजारी देखील होऊ शकता. आपण एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्यास आपणास योग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर एखादी गरोदर स्त्री या योगाला करतं असल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
* अत्तर किंवा परफ्युम वापरू नये -
हॉट योगामध्ये अत्यधिक घाम येतो. अश्या परिस्थितीत आपण अत्तर किंवा परफ्युम चे वापर करीत असल्यास हे आपल्या साठी हानिकारक ठरु शकतं. याचा मागील कारण असे की हॉट योगामुळे निघालेला घामाचा वास आणि पर्फ्युमचा वासामुळे आपल्याला चक्कर येऊ शकतात.
* हॉट योगा करण्यासाठी वेळ घ्या -
हा योगा करण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराला बळकट करावे लागणार. हॉट योगा करताना या गोष्टी कडे जरूर लक्ष द्या की आपण या योगा हळू-हळू आणि आपल्या क्षमतेनुसार करावे. बऱ्याच वेळा द्रुत फायदे मिळविण्यासाठी काही लोकं एकाच वेळी हॉट योगा करून घेतात, असे करणं हानिकारक असू शकतं.