शिंदे यांचे आमदार अपात्र झाले तरी फरक पडत नाही…भाजप मंत्र्यांचे मोठे विधान

बुधवार, 10 जानेवारी 2024 (10:05 IST)
शिवसेना अपात्र आमदारांच्या संदर्भामध्ये जो निर्णय लागेल तो संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असेल आणि महत्त्वाचा ही असेल असा विश्वास व्यक्त करून राज्याचे ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी सांगितले की, भाजपची आऊट घटकाची साथ सोडून शिवसेनेने घेतलेला निर्णय हा किती चुकीचा होता हे त्यांना आता लक्षात येईल आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. असे स्पष्ट करून ते म्हणाले काँग्रेसचे काही माजी मुख्यमंत्री हे भाजपच्या संपर्कातच आहे.
 
राज्याचे  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मंगळवारी नाशिक दौऱ्यावरती आले होते, यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत त्यांनी  विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.
 
त्यापूर्वी ग्रामविकास राज्यमंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शिवसेना आमदार अपात्रते बाबतचा निर्णय ही शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो देशाला दिशादर्शकच असणार आहे. त्यामुळे या निर्णयाला खूप महत्त्व आहे परंतु शिवसेना नेते  उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय चुकीचा होता या दोन्हीही भूमिकेतून उद्धव ठाकरे यांनी विचार करायला पाहिजे होता असे सांगून ते म्हणाले की आज 23 आमदार एका बाजूला आहेत आणि मूठभर आमदारांसाठी उद्धव ठाकरे हे लढा देत आहेत, या सर्व प्रकरणाचा भाजपचा काहीही संबंध नाही विनाकारण या सर्व प्रकरणांमध्ये भाजपचे नाव हे घेतले जात आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रश्नाबाबत बोलताना देखील ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये काहीच फरक नाही लोकांमध्ये परिस्थिती सारखीच आहे.

 विधानसभा अध्यक्षांनी त्यांनी सर्व ऐकून घेतल्यानंतर ते पुढील निर्णय देतीलच आमदार अपात्र जरी झाले तरी आमचे सरकार पडणार नाही दादांचे आमदार आमच्या सोबतच आहेत काहीजण मनाने आमच्याबरोबर आहेत शरीराने त्यांच्याबरोबर आहे असे स्पष्ट करून गिरीश महाजन म्हणाले की पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही होणार नाही तर हा प्रश्न येतच नाही.
 
हा विकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, त्यांचे नेते ठरवतात एक ठरलेला असतो दुसराच मी तर चॅलेंज करतो आता तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा म्हणजे निवडणूक अधिक सोपी होईल असे सांगून गिरीश माझे म्हणाले की, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आमच्याबरोबर एकत्र निवडणूक लढली आणि आऊटघटकेसाठी तुम्ही शरद पवार आणि सोनिया गांधी यांना मांडीवर बसवलं आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप हे 45 प्लस होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
शिवसेना ठाकरे गट नाशिकमध्ये अधिवेशन घेत आहे.  याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की , त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यावेळेस आम्ही तुमच्याबरोबर होतो हे लक्षात ठेवा आम्ही तुमचा मान सन्मानच केला परंतु तुम्ही काय केले याचा आत्मचिंतन करा.
 
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विश्वासावरती एकदा आत्मपरीक्षण करावे, तुम्हाला विश्वास नाही का तुमच्या कार्यकर्त्यांवरती आणि पदाधिकाऱ्यांवरती तुमचे नेते हे आमच्या सोबत येण्यास तयार आहेत त्यामध्ये काही माजी मुख्यमंत्री देखील आहेत असे सांगून तुम्ही सांभाळून राहा असा सल्ला महाजन यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिला.

Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती