शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला

सोमवार, 8 जानेवारी 2024 (15:52 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी केलेलं बंड हे पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेच्या कारवाईला पात्र ठरते का, हा सर्वत्र प्रश्न आहे.
10 जानेवारीपर्यंत ते उत्तर देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आहे.राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेचा काय निकाल देणार या कडे देशाचं तसेच राज्यच लक्ष देखील आहे. निकाल उद्धव ठाकरे गटाकडे लागला तरीही राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा निकाल बुधवार 10 जानेवारी दुपारी 4 वाजे नंतर लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निकालातील ठळक मुद्दे वाचले जाण्याची माहिती मिळत आहे. निकालाची प्रत दोन्ही गटांना दिली जाणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी केलेलं बंड आणि आपला वेगळा पक्ष स्थापित केला. नंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. आमच्या कडे आमदार आणि खासदार जास्त असल्याने शिवसेना पक्षावर आपले हक्क मिळवले. तसेच पक्षाच्या चिन्हावर देखील आमचाच हक्क असे सांगितले. ठाकरे आणि शिंदे वाद निवडणूक आयोगा पर्यंत पोहोचल्यावर खरी शिवसेना कोणाची हा निकाल अद्याप लागायचा आहे. आता 10 जानेवारीला काय निर्णय लागणार याचा कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती