HSC Exam 2023 : 12वी पेपरफुटीप्रकरणी परीक्षा केंद्राच्या संचालकांचा विरुद्ध मोठी कारवाई

रविवार, 5 मार्च 2023 (12:33 IST)
राज्यात सध्या सर्वत्र 12 वीची परीक्षा सुरु आहे. परीक्षेत सध्या मोठा घोळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरु आहे. इयत्ता 12 वीचा गणिताचा पेपर बुलडाणा येथे परीक्षेपूर्वीच लीक झाल्यामुळे शिक्षण विभागाचा कमकुवतपणा समोर आला आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून परीक्षा केंद्राच्या संचालकांच्या विरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी परीक्षा केंद्राच्या संचालकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या पेपरफुटी प्रकरणी कोणाचा हात आहे? हा पेपर कोणी व्हायरल केला याचा तपास केला जात असून शिक्षण विभाग कारवाई करत आहे. या प्रकरणी बुलडाण्यातील 4 परीक्षा केंद्राचे संचालक बदलले आहेत. गणिताचा पेपर असताना प्रश्नपत्रिकेत दोन पाने एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाले. या प्रकरणी शिक्षण विभाग कारवाई करत आहे.    
 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती