काहींचा स्वभाव विकृत असतो. परंतु, या विकृतीची वाढ होते, तेव्हा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं. तुमचा उरला-सुरला पक्ष वाढवण्याचं काम जरूर करा, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच तुमचा पक्ष उभा आहे, त्यामुळे राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा, असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे. सातारा येथील दौऱ्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला खासदार उदयनराजे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
उदयनराजे म्हणाले, "संजय राऊत यांना मी महत्त्व देत नाही. अशा प्रवृत्ती व्यक्तीकेंद्रित आहेत. परंतु, त्यांनी मोजून-मापून वक्तव्य केलं पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग व्हावा, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. त्याच संकल्पनेवर भारत सर्वात मोठा लोकशाही देश बनला आहे." ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.