एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेल्या 8-9 महिन्यांपासून ठाकरे गटातील नेते त्यांच्यावर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत.दरम्यान, ठाकरे गटात असलेल्या एका खासदाराने एका भाषणात उद्धव ठाकरे यांनाच घरचा आहेर दिला आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण तुम्ही तुमच्या मुलाला मंत्रिपद द्यायला नको होतं, असं मत परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी व्यक्त केलं.
ते पुढे म्हणाले, "तुम्ही खुर्ची अडवल्याने यांना (बंडखोरांना) वाटलं की उद्या बाप गेल्यावर पोरगं माझ्या बोकांडी बसेल. त्यापेक्षा वेगळी चूल मांडली तर काय बिघडलं, याच भूमिकेतून ही गद्दारी झाली," असं खासदार जाधव म्हणाले.
शिवाय, "उद्धव ठाकरे यांनी मधल्या काळात पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला हवं होतं. ते देऊ शकले नाहीत, म्हणून आमच्यावर हा प्रसंग ओढवला आहे," असंही जाधव यांनी म्हटलं आहे. ही बातमी लोकमतने दिली.