राज्यातील विविध भागात मुसळधार सरी कोसळत आहे. मंगळवारी मुंबई, आणि नवी मुंबई सह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली.अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. हवामान खात्यानं येत्या दोन ते तीन दिवसात पूर्व मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्यात विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागात यलो अलर्ट जाहीर केला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, नाशिक, पुणे, सातारा,सांगली, आणि कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील विदर्भात बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, अकोला, वर्धा, अमरावती, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.