गुंड गजानन मारणे याच्यासह १४ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (08:35 IST)
गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड (गज्या) गजानन मारणे याच्यासह १४ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (Maharashtra Control of Organised Crime Act) ची कारवाई करण्यात आली.
 
सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय ४३, रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय३९,रा. बुरली, ता. पलुस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. समर्थनगर,कोडोवली, जि.सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा.नऱ्हे), नितीन पगारे (रा.सातारा), प्रसाद खंडागळे (रा.तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. यात चौघांना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेनंतर गज्या मारणे व इतर फरार झाले आहे.
Edited By - Ratandeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती