शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर पक्षचिन्हासाठी तीन पर्याय दिले होते. यामध्ये ‘तळपता सूर्य’, ‘ढाल-तलवार’ आणि ‘पिंपळाचं झाड’ यांचा समावेश होता. शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ चिन्ह पहिली पसंती होती. पण निवडणूक आयोगाने शिंदे गटाला हे चिन्ह देण्यास नकार दिला. यामागील कारणही निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे.
निवडणूक आयोगाने काय सांगितलं?
“नुसता सूर्य आणि उगवता सूर्य ही दोन्ही चिन्हं आधीच इतर पक्षांना देण्यात आली आहेत. फक्त गोलाकार, कोणतीही किरणं नसणारा सूर्य झोराम नॅशनलिस्ट पक्षाला देण्यात आला आहे. तसंच उगवता सूर्य डीएमके पक्षाला देण्यात आला आहे. तुम्ही मागणी केलेलं चिन्ह यांच्याशी मिळतं जुळतं आहे. तुमच्या चिन्हामुळे संभ्रम वाढेल. यामुळे तळपता सूर्य चिन्ह आम्ही नाकारत आहोत,” असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.