अखेर नाशिक मधील तो बहुचर्चित विवाह सोहळा शुक्रवारी संपन्न झाला.रसिका आडगावकर आणि आसिफ खान या हिंदू आणि मुस्लिम धर्मातील दोघांचा विवाह सोहळा 18 जुलै रोजी संपन्न होणार होता, परंतु काही संघटनांनी या लग्नाला विरोध दर्शविला होता.त्याचप्रमाणे या दोघांच्या विवाह सोहळ्याच्या लग्न पत्रिकेला सोशल मीडियावर व्हायरल करत याला लव जिहादचा रंग देण्यात आला होता.त्यानंतर दोन्ही परिवारातील लोकांनी हा लग्न सोहळा रद्द करत पुढे ढकलला.अशातच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाशिक दौऱ्यावर असताना या विवाह सोहळ्याला आपला पाठींबा दर्शविला होता.अखेर दोन्ही परिवारांच्या उपस्थितीत शहरातील एका हॉटेलमध्ये हा आसिफ आणि रसिका यांचा विवाहसोहळा दोन्ही समाजातील धार्मिक पद्धतीने मोठ्या आनंदात आणि थाटामाटात संपन्न झाला.त्यांच्या या विवाह सोहळ्याने दोन्ही परिवारातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.