राज्यातील इयत्ता 12 वीची परीक्षा अखेर रद्द

गुरूवार, 3 जून 2021 (16:18 IST)
राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.
 
राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत 12 वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता 10 वीप्रमाणेच राज्यातील 12 वीच्या विद्यार्थ्यांचंही मूल्यमापन केलं जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करुन परीक्षा घेणं योग्य नाही. परीक्षा रद्द करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची मते जाणून घेतली. कोरोना काळात पाल्य, पालक, शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांचे जीव धोक्यात घालणे योग्य नाही. दहावीची परीक्षा रद्द केली, त्याच निकषावर  बारावीचीही परीक्षा रद्द केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती