नंदुरबार – राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत मौजे खापर येथील प्रभाग क्रमांक 3 अ मधील सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक प्रक्रियेत बाधा आल्यामुळे या जागेची निवडणूक रद्द समजून या जागेसाठी फेर निवडणूक घेण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ( महसुल प्रशासन ) नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
असा आहे फेर निवडणूकीचा कार्यक्रम
मतदान शुक्रवार 23 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत घेण्यात येईल. मतमोजणीचे व निकाल घोषित करण्याची तारीख शुक्रवार 23 डिसेंबर, 2022 (मतदान संपल्यानंतर लगेचच) ही असेल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोमवार 26 डिसेंबर, 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, असेही उपजिल्हाधिकारी श्री.सदगीर यांनी कळविले आहे.