नाशिक: माळी समाज सेवा समितीच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगला खिवंसरा यांचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान तसेच क्रांतिसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार वितरण समारंभ ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालीमार नाशिक येथे होणार आहे. तयारी संदर्भात कार्यकारी मंडळाची बैठक रविवारी दि.(१८) रोजी सकाळी ११ वाजता जुना आडगाव नाका पंचवटी येथे माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे शिवाय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित व्यख्यान,माळी समाजाची दिनदर्शिका प्रकाशन असे विविध कार्यक्रम ०३ जानेवारी २०२३ रोजी होणार असून यावेळी महात्मा फुले यांच्या विचारावर आधारित कार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सहकारी, शैक्षणिक,कामगार, औद्योगिक,नाट्य व सिनेक्षेत्रातील कलावंत ,नाटककार ,पत्रकारिता ,वैद्यकीय व बांधकाम क्षेत्रांतील सर्व समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार देऊन माळी समाज सेवा समितीच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.