राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या सोमवार पासून

रविवार, 18 डिसेंबर 2022 (17:44 IST)
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्या म्हणजे सोमवार पासून सुरु होणार असून या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य, महाराष्ट कर्नाटक सीमावाद प्रश्न, ओला दुष्काळ जाहीर करणे, महाराष्ट्राच्या हातातून गेलेले प्रकल्प, वाढणारी महागाई,आणि बेरोजगारी हे विषय चांगलेच उचलून धरले जाणार आहे. त्या मुळे यंदाचं राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गाजणार आहे. 

यंदा अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला या सर्व प्रश्नांना सामोरी जावे लागणार आहे. यंदा नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. गेल्या दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे होऊ शकले नाही. यंदाचे नागपूरमधील राज्य विधिमंडळाचे अधिवेशन अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीने मोर्चा काढून दिले आहे. राज्यपालांची पदावरून काढण्याची मागणी उचलून धरली जात आहे. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यावरून देखील शिंदे-फडणवीस सरकार समोर हा मुद्दा अधिवेशनात तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट -कर्नाटक सीमा वाद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेलं अवमानकारक वक्तव्य, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मन्त्री राव साहेब दानवे, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधी पक्ष लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  उद्या पासून म्हणजे 19 डिसेंबर पासून 29 डिसेंबर पर्यंत विधिमंडळाचे अधिवेशन होणार असून त्यासाठी नागपुरात जय्यत तयारी सुरु आहे. नागपुरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या हाती बरेच मुद्दे लागल्यामुळे यंदाचे अधिवेशन चांगलेच गाजणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती